रविवारी ऑक्सिपार्क चे उद्घाटन

रविवारी 'ऑक्सिपार्क' चे उद्घाटन
लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख यांची प्रमुख उपस्थितीपनवेल (प्रतिनिधी) महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या संकल्पनेतून पनवेलमध्ये साकारण्यात आलेल्या 'ऑक्सिपार्क'चे उद्घाटन रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६. ३० वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.


             पनवेलमधील पर्यावरणीय प्रगतीशील परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि सकारात्मक वातावरणीय बदल करण्यासाठी कोशिश फाऊंडेशनच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या ऑक्सिपार्क या आगळ्यावेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनासाठी यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. नागरिकांसाठी सामुदायिक पोषक जागा, शहराच्या विकासाबद्दल नागरिकांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, शहराचे वाढते तापमान कमी करणे, तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढविणे आणि शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ऑक्सिपार्क महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या ऑक्सिपार्कच्या लोकार्पण सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, खजिनदार अभिजित जाधव, सचिव ऍड. चेतन जाधव, उपाध्यक्ष मयुरेश नेतकर, सदस्य नितीन पाटील, सत्यवान नाईक, चिन्मय समेळ, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप यांनी केले आहे. थोडे नवीन जरा जुने