पनवेल रेल्वे स्टेशनजवळ आढळला मृतदेह


पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील लोकल लाईन समोरील रिक्षा स्टॅन्ड जवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. पनवेल रेल्वे पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.
या मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४५ वर्षे असून उंची ५ फूट ५ इंच, अंगाने सडपातळ, रंग गहूवर्णं, डोक्याचे केस काळे पांढरे वाढलेले, नाक सरळ, चेहरा उमट अंगात निळ्या रंगाचा फुल बाह्याचा टी शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट, आतमध्ये राखाडी रंगाची हाफ पॅन्ट घातली आहे. या व्यक्तीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस दूरध्वनी क्र. ०२२-२७४६७१२२ किंवा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. दोडमिसे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने