लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक,शताब्दी वर्ष पुर्ण, विविध पुस्तकांचे प्रदर्शन,श्रावणी जोशी हिचा हिचा सत्कार समारंभ






लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक,शताब्दी वर्ष पुर्ण, विविध पुस्तकांचे प्रदर्शन,श्रावणी जोशी हिचा हिचा सत्कार समारंभ 

काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : २५ एप्रिल,  

               लोकमान्य टिळक मोफत वाचनालय चौक येथे असलेल्या ग्रंथालय यांस १०३ वर्ष पुर्ण होताच हजारो पुस्तकांचे प्रदर्शन कै.भास्कर रघुनाथ पेंडसे" सभागृह चौक येथे भरविण्यात आले.या पुस्तकांचे प्रदर्शन चे अनावरण सुरेश वत्सराज यांचे हस्ते करण्यात आले



.यावेळी या परिसरातील विद्यार्थी ,शिक्षक,तसेच वयो वृद्ध नागरिकांनी या पुस्तक वाचण्यांचा मनोसोक्त आनंद लुटला, खालापूर तालुक्यातील चौक येथिल राहणारी श्रावणी यशवंत जोशी हिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट (आय.आय.एम) इथून मास्टर ऑफ बिजनेस अटमिनी स्ट्रेशन ( एम.बी. ए ) ची डिग्री कलकत्ता येथून संपादन केल्यामुळे ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री.सुरेश आप्पा वत्सराज यांचा हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पुस्तक वाचण्यांचा अनेकांना खुप छंद असतो.



मात्र विकत घेण्यासाठी अनेक जण असक्षम असतात. यामुळे पुस्तकामधुन मिळणारे ज्ञान मिळत नाही.मात्र त्यांची ही तुटी दुर करण्यासाठी गेले दोन दिवस विनामूल्य पुस्तक प्रदर्शन आयोजन करण्यात आले.असून यामध्ये गृहीणी चे पाक कला पासून ते भारताचा इतिहास,म्हणी,उखाने,छत्रपती शिवाजी महाराजा पासून ते विविध राजे महाराजे यांच्या शौर्यांच्या कथांची पुस्तके ,ग्रंथ,कथासंग्रह ,बोधकथा असे विविध पुस्तकाचे प्रदर्शन भरविण्यात आले. या ग्रंथालयाचे अध्यक्ष सुरेश सदाशिव वत्सराज,सेक्रेटरी - सतीश कृष्णा आंबवणे,विश्वस्त - रजनीकांत मोतीलाल शाह,ग्रंथपाल - अभिजित चौधरी, तपासनीस - ऐश्वर्या जोशी,डॉ .श्रीनिवास गजानन वाळिंबे,डॉ.अपर्णा श्रीनिवास वाळिंबे,रंजना पंढरीनाथ साखरे,अशोक बाळकृष्ण चौधरी,काशिनाथ रघुनाथ खंडागळे,पूनम प्रभाकर चोगले,राजन मोतीलाल चौधरी,अजिंक्य अशोक चौधरी,राजेश गोविंद आंबवणे,मुरलीधर नाना साखरेत्याच बरोबर मनोज भालचंद्र साखरे,



                   


थोडे नवीन जरा जुने