भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केले विविध ठिकाणी जाऊन अभिवादन

पनवेल दि.१४ (संजय कदम) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी पनवेल शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित अभिवादन कार्यक्रमात सहभाग घेऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.                  पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याला महेश साळुंखें यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पनवेल महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन मध्ये जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला.


 तसेच पालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे तालुक्यातील करंजाडे बुध्द्धविहार, पंचशीलनगर, वडघर रमाबाई बुद्धविहार, शिवाजीनगर यांच्यासह परिसरातील विविध ठिकाणी आयोजित भीमजयंतीच्या कार्यक्रमात सहभाग घेऊन समाज बांधवांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले. थोडे नवीन जरा जुने