महिला सक्षमीकरण उपजीविका प्रकल्प फेज २ चे उदघाटनपनवेल दि.१५ (वार्ताहर) : तालुक्यातील पडघे गाव येथे आझादी का अमृत महोत्सव याचा एक भाग म्हणून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि बामर लॉरी अँड कंपनी लि. अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून सक्षम फाउंडेशन सोबत महिला सक्षमीकरण शाश्वत उपजीविका हा प्रकल्प सुरू केला होता. याचा दुसरा टप्पा आझादी का अमृत महोत्सव उत्सवाच्या दुसऱ्या वर्षाचा भाग म्हणून फेज 2 या प्रकल्पाचे उद्घाटन पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय उपसचिव ए.एन.झा यांच्या हस्ते पार पडले. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी, उद्योजकता निर्माण असे या प्रकल्पाचे स्वरूप असून या अंतर्गत पडघे येथे शाश्वत उपजीविकेसाठी 5 बचत गट तसेच आदिवासी महिलांचे गट बनवून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील पडघे व फणसवाडी गाव या ठिकाणातून सुमारे ७५ वंचित महिलांना कार्यक्रमाचा लाभ होणार आहे. यापूर्वी बामर लॉरी यांनी 400 वंचित महिलांसाठी टेलरिंग,केक मेकिंग,मेहंदी,ऍडव्हान्स ब्लाउज मेकिंग,कापडी पिशव्या व गोधडी बनवणे,साडी कव्हर,बटवा पाऊच बनवणे इ प्रशिक्षण कार्यक्रम सक्षम फाउंडेशन च्या माध्यमातून राबवले आहेत. या प्रकल्पाविषयी बोलताना बालमेरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आदिका रत्न शेखर यांनी सांगितले की, कंपनीच्या उन्नतीसाठी कंपनी बामर लॉरीच्या युनिट्स आणि आस्थापनांच्या आसपास राहणारे समुदाय यांच्या विकासासाठी काम करत राहील
. आझादी का अमृत महोत्सव म्हणून विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. याप्रसंगी बामर लॉरी कंपनीचे असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट,जेम्स पॉल, हेड CSR दिलीप दास, प्लांट हेड श्री कमलेश, ऑपरेशन हेड एस पी सिंग, एचआर विभागाचे सुभाष अगवणे, सक्षम फाउंडेशन च्या शुभांगी कदम, ऍड तृप्ती कदम, शंकर आपटे, राजेश पुरोहित, कविता गाढे, ज्योती कांबळे, पूनम भोईर, सुजाता पवार, अदिती पाटील, भाजप नेते कृष्णा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने