गाडीतील काच फोडून इंफोटेंमेंट सिस्टीमची चोरी


गाडीतील काच फोडून इंफोटेंमेंट सिस्टीमची चोरी
पनवेल दि.२४ (संजय कदम) : पनवेल शहरातील ठाणे नाका रोडवर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनांची काच फोडून अज्ञात चोरट्याने इंफोटेंमेंट सिस्टिम चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


  
 प्रसाद जयंत घैसास यांनी आपली मारुती वॅगन आर कार पनवेल शहरातील ठाणा नाका रोडवर उभी करून ठेवली होती. मात्र रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गाडीतील डाव्या बाजूची काच फोडून गाडीतील इंफोटेंमेंट सिस्टीम चोरून नेली. अशाचप्रकारे पनवेल परिसरात गाडीतील काचा तोडून साहित्याची चोरी होत असल्याने वाहनमालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. थोडे नवीन जरा जुने