शनिवारी आपटा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर; आमदार महेश बालदी यांचे आयोजन
पनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी उरण विधानसभा तसेच एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे- कळंबोली व आपटा प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत आपटा येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे.  प्राथमिक आरोग्य केंद्र आपटा येथे होणाऱ्या या शिबिरास भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष रामदास ठोंबरे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या शिबिरात रुग्णांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला मिळणार असून आरोग्य तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया त्याचबरोबर डोळयांची तपासणी व चष्मे वाटप, कृत्रिम हात व पाय बसविण्याचे शिबिराचाही यामध्ये सहभाग आहे. 


       या शिबिरात सामान्य तपासणी, शल्य चिकित्सा, स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, अस्थिरोग, त्वचारोग, कान, नाक, घसा, नेत्ररोग, दंत चिकित्सा, औषधे, फिजिओथेरपिस्ट, रक्त तपासणी, इ.सी.जी. आदी सेवा उपलब्ध असणार आहेत. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ७५०७२२५५३९, ९१६७६९५२०९ किंवा ७४९८९८१३६८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. 


थोडे नवीन जरा जुने