शीर्षक नाही

रिक्षाच्या ठोकरीने पादचारी महिला जखमी रिक्षाच्या ठोकरीने पादचारी महिला जखमी 
पनवेल दि , ०९ (वार्ताहर) : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेला रिक्षाची ठोकर बसून त्यात त्या जखमी झाल्याची घटना पनवेल जवळील पेंधर फाटा येथील सीएनजी पंपाजवळच्या बस स्टॉप जवळ घडली आहे.

 
              रिक्षा चालक प्रल्हाद खांडगे ( वय ३५) याने त्याच्या ताब्यातील रिक्षा हयगयीने व भरधाव वेगाने चालवून रस्ता ओलांडण्याकरिता रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंचनदेवी राजकपूर राम (वय २६) यांना ठोकर मारून झालेल्या अपघातात त्यांना साध्या व गंभीर दुखापती झाल्या आहेत. या बाबत तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने