नैना प्रकल्प व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भातील विविध समस्या मार्गी लावण्याचे नैना प्रकल्पाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांचे मनसेच्या शिष्ट मंडळाला आश्वासन.

विविध समस्या संदर्भात मनसेच्या शिष्ट मंडळाने घेतली नैना प्रकल्पच्या अधिकाऱ्यांची भेट.
विविध समस्या संदर्भात झाली सकारात्मक चर्चा.
स्थानिक भूमीपुत्र, प्रकल्पग्रस्तांना मनसेच्या माध्यमातून मिळणार न्याय.उरण दि 6 (विठ्ठल ममताबादे) रायगड जिल्हा व नवी मुंबई मध्ये विविध प्रकल्प येत असून त्यापैकी एक असलेल्या नैना प्रकल्प व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात स्थानिक भूमीपुत्रांच्या प्रकल्पस्तांच्या अनेक समस्या होत्या.त्या समस्या सुटाव्यात, प्रकल्प ग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघावा,स्थानिक भूमीपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा या अनुषंगाने मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्ट मंडळाने सिडको कार्यालयात जाउन नैना प्रकल्पाचे सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांना भेडसावणाऱ्या विविध समस्या त्वरीत सोडविण्याची मागणी केली. यावेळी विविध समस्या व प्रकल्प ग्रस्तांच्या मागच्या संदर्भात मनसेतर्फे राजेश पाटील (सह व्यवस्थापकीय संचालक जॉईट एमडी नयना व आंतरराष्ट्रीय विमानतळ एअरपोर्ट संचालक) यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना पनवेल मनसे तालुकाध्यक्ष रामदास पाटील, चिंतामणी मुंगाजी उपतालुका अध्यक्ष पनवेल,नरेंद्र मोकल उपतालुका अध्यक्ष पनवेल,संतोष घरत मनसैनिक, नितेश पाटील मनसैनिक मनोज कोळी उलवे शहर सचिव, कल्पेश कोळी पंचायत समिती अध्यक्ष उलवे, सुनील कोळी सरचिटणीस उलवे शहर,गुरु भोपी विभाग अध्यक्ष दूंदरे,सोनी बेबी मनसैनिक, संजय तन्ना रस्ते स्थापना रायगड जिल्हा अध्यक्ष आदी पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या पदाधिका-यांनी भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांची कैफियत प्रशासनासमोर मांडली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात डोंगर फोडी मोठ्या प्रमाणात होत आहे. या ब्लास्ट मूळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणात भेगा, चि-या पडल्या आहेत.अनेकांची घरे खराब झाली आहेत.अनेक घरांचे प्रचंड प्रमाणात नुकसान देखील झाले आहेत. मात्र या घरात राहणाऱ्या नागरिकांना कोणते नुकसान भरपाई मिळत नाही तसेच शासनही या समस्याकडे लक्ष देत नाही. शिवाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कामा संदर्भात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेत काम सुरू आहे. 


स्थानिक भूमीपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य दिले जात नाही. तसेच नैना प्रकल्पा संदर्भात नैना प्रकल्पा मध्ये हस्तांतर झालेल्या जमीनी 60% शेतकऱ्यांना देण्यात यावे. 60% जमिनीवर कोणताही प्रकारचा कर आकारला जाऊ नये. गुरुचरण, गावठाण अकारीपड आदी जागा या स्थानिक भूमीपुत्रांच्या सुखसुविधांसाठी आरक्षित करण्यात याव्यात आदी मागण्या नैना संदर्भात मनसेतर्फे करण्यात आल्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भात असलेल्या समस्या त्वरित सोडवाव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली.यावर सह व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून लवकरच या समस्या वरिष्ठांना कळवून या समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन राजेश पाटील यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. मनसेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशा नुसार


 प्रकल्पग्रस्तांच्या विविध समस्या संदर्भात संबंधित शासकीय अधिका-यांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात आले. सदर समस्या सोडविण्याचे आश्वासन प्रशासनातर्फे मिळाले असल्याचे मनसेचे पनवेल तालुकाध्यक्ष रामदास पाटील यांनी यावेळी सांगितले.मनसेने प्रशासनाच्या घेतलेल्या भेटीमुळे व मनसेने प्रकल्पग्रस्तांच्या समस्येवर आवाज उठविल्याने मनसेच्या माध्यमातून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना, शेतकऱ्यांना न्याय मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


थोडे नवीन जरा जुने