कळंबोली येथे इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न.कळंबोली

 

कळंबोली येथे इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न.कळंबोली 

सुनील भोईर :- पवित्र रमजान दिनाचे औचित्य साधून मोहम्मद जमील खान, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सर अफसर , साप्ताहिक रायगड दर्पण आणि महाविकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने दावत ए इफ्तार पार्टीचे आयोजन कळंबोली येथे करण्यात आले होते.दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी कलंबोली मस्जिद समोरील मैदानात पवित्र रमजान दिनाच्या निमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांनी २६ वा रोजा सोडण्यासाठी एकत्र आले होते. यावेळी आयोजक मोहम्मद जमील खान, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन सर अफसर , साप्ताहिक रायगड दर्पण आणि महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 पवित्र रमजान दिनानिमित्ताने सर्वांनी ७ वाजता रोजा सोडण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज पठण करून संध्याकाळी ७ वाजता रोजा सोडण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे शिवसेना( उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुदाम दादा पाटील, नगरसेवक रवींद्र भगत, आयोजक मोहम्मद जमील खान, रायगड दर्पण चे मालक डॉन .एन. के. के, संपादक सुनील भोईर तसेच इतर मान्यवर आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोजा सोडून झाल्यानंतर आयोजक जमीन खान यांनी इफ्तार पार्टीला आलेल्या सर्व पाहुण्यांचे मानले आभारथोडे नवीन जरा जुने