बाळू विठ्ठल जाधव यांचे अल्पशा आजारांने निधन







  


  काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
  पाताळगंगा १९ एप्रिल   
               पनवेल तालुक्यातील कळंबोली येथिल राहणारे बाळू विठ्ठल जाधव यांचे अल्पशा आजाराने दि.१५ एप्रिल रोजी निधन झाले.ते वयाच्या ६२ वर्षाच्या होत्या.त्यांच्या अंत्यविधीस सामाजिक,राजकीय,वारकरी आशा विविध स्तरातील मान्यवर त्यांच्या अंत्य दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते. त्यांचा मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली गेली.


सर्व समाजामध्ये ऐक्यांचे,बंधुत्त्वाचे,शांतता व सलोख्याचे वातावरण निर्माण होण्याकरता ते सतत प्रयत्नशील असायचे ईश्वर भक्ती वर मोठी श्रद्धा होती.अशी व्यक्ती सोडून गेल्यांने कुटुंब आणि ग्रामस्थ यांच्या वरती शोककला पसरली आहे. त्यांचे जन्मभूमी खालापूर तालुक्यातील माजगांव आंबिवली येथिल, मात्र काही व्यवसाय यांच्या निमित्ताने त्यांचे वडील पनवेल येथे गेले असतांना ते तेथेच स्थायिक झाले होते. 



 त्यांचे दशक्रिया विधी सोमवार २४ एप्रिल रोजी श्री क्षेत्र धाकटी पंढरी साजगांव तर उत्तरकार्य सोमवार दिनांक २७ एप्रिल रोजी एलआयजी - १ रुम नं एल ४६ सेक्टर ३ ई कळंबोली, सप्तशृंगी माता मंदिर, त्यांच्या निवास स्थानी होणार असून या निमित्ताने ह.भ.प.रामदास महाराज पाटील खोपोली( गुरुकुल संस्था महड ) यांचे सकाळी १० वाजता प्रवचन होणारा आहे.त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा राहुल जाधव,भाऊ - प्रकाश जाधव,प्रभाकर जाधव,संजय जाधव, बहिणी,आत्या सुना ,नातवंडे ,पंतवडे ,जावई, असा मोठा परिवार आहे.





थोडे नवीन जरा जुने