नवीन पनवेल ब्रिजखाली आढळला मृतदेह





नवीन पनवेल ब्रिजखाली आढळला मृतदेह*
पनवेल दि.१२ (संजय कदम) : नवीन पनवेल येथील ब्रिजखाली एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करत आहे.



               सदर इसमाचे अंदाजे वय ५५ ते ६० वर्ष असून त्याची उंची ५ फूट ६ इंच, अंगान मजबूत, वर्ण सावळा, चेहरा गोल, डोक्यास केस काळे व पांढरे विस्कटलेले, दाढी वाढलेली, मिशी फ्रेंच कट पांढरी, चेहऱ्यावर उजवा भाग काळा पडलेला आहे. 



तसेच त्याने अंगात गुलाबी रंगाचा मळकट फुल बाहयाचा शर्ट व निळया रंगाची मळकट हाफ पॅन्ट घातलेली आहे. इसमाबाबत किंवा त्याच्या नातेवाइकांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी क्र ०२२-२७४५२३३३ किंवा पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्याशी संपर्क साधावा. 



थोडे नवीन जरा जुने