रमजान आणि उन्हाच्या वाढत्या तडाख्याने बाजारात रसाळ फळांना वाढली मागणी





रमजान आणि उन्हाच्या वाढत्या तडाख्याने बाजारात रसाळ फळांना वाढली मागणी* 
पनवेल दि.१३ (संजय कदम) : सध्या सुरु असलेल्या रमजान महिना तसेच उन्हाचा वाढत्या तडाखामुळे बाजारात रसाळ फळांना मागणी वाढली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात कलिंगड, पपई आणि टरबूज फळे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. 


                       सध्या सुरु असलेल्या रमजान महिना तसेच उन्हाचा वाढत्या तडाखामुळे जागोजागी फळांचे रस, फळांचे सॅलड यांच्या गाड्या लागलेल्या दिसतात. त्यामुळे सध्या बाजारात या फळांना मागणी वाढली आहे. मात्र तरीही फळांच्या किमती मात्र स्थिर आहेत. रमजान महिन्यात रोजे सोडण्यासाठी बहुतांश लोक फळांचे सेवन करतात. त्यामुळे या रसदार फळांना मोठी मागणी आहे. म्हणूनच कलिंगड, पपई, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत.


 सध्या बाजारात कलिंगड ५० ते ७० रुपये प्रतिनग भाव आहे. शहराच्या मुख्य भागासह गल्लीबोळातून फळ विक्रेते हातगाडीवर फळे विकताना दिसत असून ग्राहकांचा त्यांना प्रतिसाद मिळत आहे. उन्हाळ्याच्या तोंडावरच महागणारी रसदार फळे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील, अशा दरात साध्या उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिक उन्हाळी फळांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. विविध फळे खाण्यासह त्यांचा ज्यूस पिण्याकडेही नागरिकांचा कल वाढला आहे. 


त्यामुळे वर्षभर फळांचा रस आरोग्यास चांगला असून, तहानही भागवत असल्याने त्याला मोठी मागणी आहे. वर्षभर शहरात फळांच्या रसांची दुकाने फारशी दिसत नसली तरी उन्हाळा सुरू होताच त्यांच्या संख्येत भर पडली जाते. या दुकानांमधूनही फळांना मोठी मागणी आहे. घरी फळे खाण्यासह ज्यूस सेंटरमध्ये विविध फळांचे रस पिण्याला नागरिक प्राधान्य देत आहेत.



थोडे नवीन जरा जुने