चिमुकल्यासह आई बेपत्ता

चिमुकल्यासह आई बेपत्ता
पनवेल दि.२४ (वार्ताहर) : कळंबोली मॅक्डोनल्ड येथुन पुण्याला जाण्यासाठी एसटी बस मध्ये बसलेली २६ वर्षीय महिला आपल्या २ चिमुकल्यासह पुणे येथे न पोहोचल्याने ती हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.  कळंबोली येथून पुणे येथे जाण्यासाठी श्रेयशा अजय शिरसागर (वय २६ वर्षे) व तिचा मुलगा नामे शिवांश अजय शिरसागर (वय-२.५ वर्षे) कळंबोली मॅक्डोनल्ड येथुन एसटी बसमध्ये बसले मात्र पुणे येथे न पोहोचल्याने ते दोघे हरवल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास कळंबोली पोलीस ठाणे किंवा पोलीस हवालदार एस.व्ही. मासुळ यांच्याशी संपर्क साधावा. 
थोडे नवीन जरा जुने