गावदेवी यात्रे निमित्त जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पालेच्या वतीने पाले गावात रंगला खेळ पैठणीचा कार्यक्रम.
उरण दि 23(विठ्ठल ममताबादे )एप्रिल मे महिना अर्थात मराठी नवं वर्षाचा चैत्र महिना म्हणजे आगरी, कोळी समाजात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या यात्रा - पालख्यांचा हंगाम.चैत्र महिना सुरू झाला की गावं - खेड्यांत सुरू होतो तो ग्राम देवतांच्या पालखी - यात्रा उत्सवाच आयोजन. आणि हे आयोजन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातोय. आणि म्हणूनच ग्राम देवता भवानी मातेच्या ग्राम यात्रेच आयोजन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला तो उरण तालुक्यातील पाले ह्या गावांत. जय भवानी नवतरुण मित्र मंडळ पाले यांच्या आयोजनातून 2003 साली स्थापना झालेल्या या मंडळाने आज पर्यंत अनेक सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रात आपल्या मंडळाच्या माध्यमातून समााजहिताचं कार्य करतं गावाच्या सर्वांगीण विकाससाठी आणि आपल्या रूढी - परंपरा जपण्यासाठी खूप सारं मोलाचं योगदान दिलं आहे.

ग्राम देवता यात्रेचे औचित्य साधत ग्राम देवता आई भवानी मातेच मंडळातील सर्व सदस्य आणि खास करून महिला सदस्यांनी मंदिरात भवानी मातेची यथासांग पूजा अर्चना करून भक्तिमय वातावरणात यात्रौत्सव साजरा केला गेला आणि याच ग्राम यात्रेच्या निमित्ताने खास महिलांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, निवेदक नितेशजी पंडित,डान्स कोरिओग्राफर,पपण पाटील, निवेदक श्याम ठाकूर प्रस्तुत खेळ पैठणीचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.
     या कार्यक्रमाकरिता प्रमुख मान्यवर म्हणून रायगड भूषण राजू मुंबईकर, संगिताताई म्हात्रे(पाले गावं काँग्रेस महिला अध्यक्षा ),सत्यवान भगत ( उरण तालुका अध्यक्ष मनसे),समाधान म्हात्रे( उपसरपंच पाले ), रुपेश भगत( अध्यक्ष न्हावा शेवा सी. एच. ए.संघटना),चंद्रकांत गावंड ( उपसरपंच पिरकोन),अनिल घरत ( उरण तालुका सचिव - आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था),अमित म्हात्रे ( गावं अध्यक्ष पाले),रामकृष्ण म्हात्रे(गावं उपाध्यक्ष पाले) त्याच सोबत जय भवानी नवतरुण मित्र मंडळाचे खजिनदार आयोजक हनुमंत म्हात्रे आणि मंडळालातील सर्व सदस्य , महिलां भगिनी व पाले ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.खेळ पैठणीचा या कार्यक्रमात पैठणी विजेत्या प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या त्या दर्शना विनायक म्हात्रे तर उप विजेत्या ठरल्या त्या संजीवनी उपेंद्र म्हात्रे या खेळात विजेत्या ठरलेल्या वहिनीं करिता खास बक्षीस म्हणून सुंदर अश्या भरजरी पैठणी पाले गावच्या काँग्रेस महिला अध्यक्षा संगिताताई म्हात्रे यांच्या कडून देण्यात आल्या.
 अगदी भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात साकारलेल्या ह्या कार्यक्रमाच सूत्रसंचालन केले ते अमर म्हात्रे यांनी या कार्यक्रमा करिता पाले गावांतील महिला भगिनींनी अगदी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. सर्व मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.


थोडे नवीन जरा जुने