लोकलच्या धडकेने इसमाचा मृत्यू







लोकलच्या धडकेने इसमाचा मृत्यू
पनवेल दि १६( संजय कदम) : पनवेल जवळील मानसरोवर ते खांदेश्वर रेल्वे स्टेशन दरम्यान एका अज्ञात लोकल गाडीची ठोकर लागून एक इसम गंभीर रित्या जखमी होऊन मृत्यू पावल्याने त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल रेल्वे पोलीस करीत आहेत. 


                    सदर अनोळखी मयत इसम हा मुस्लिम असून वय अंदाजे ३५ वर्षे, उंची पाच फूट चार इंच, अंगाने सडपातळ, रंगाने गहूवर्ण, चेहरा उभट, नाक सरळ असून अंगात लाल रंगाचा हाफ टी शर्ट व गुलाबी रंगाची हाफ पॅन्ट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलीस संपर्क क्रमांक २७४६७१२२ किंवा पोलीस उपनिरीक्षक डी. एस. बदाले मो. न. ९४९४९१२२९४ येथे संपर्क साधावा. 



थोडे नवीन जरा जुने