जुगाराचा अड्डा चालवण्यासाठी जुगारचालकाची अनोखी शक्कल; वेळोवेळी जागा बदलत असल्याने पोलिसही झाले हैराण

जुगाराचा अड्डा चालवण्यासाठी जुगारचालकाची अनोखी शक्कल; वेळोवेळी जागा बदलत असल्याने पोलिसही झाले हैराण  
पनवेल दि.३० (वार्ताहर) : पनवेल परिसरातील आदई येथील जुगार चालकाने आपल्या अड्ड्यावर कारवाई होऊ नये म्हणून वेगळीच शक्कल लढविली आहे. कधी डोंगराच्या कडेला, तर कधी झाडी झुडपात अश्या वेगवेगळ्या ठिकाणी अड्डा भरवला जात असून पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी चक्क दोन मुलांची नेमणूक करण्यात आली आहे. या जुगारात रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. खांदेश्वर पोलिसांनी अनेक वेळा या जुगार अड्डयावर छापा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सततच्या जागा बदलल्यामुळे पोलिसांना चकमा देण्यात या जुगार चालकाला यश आले आहे. त्यामुळे या जुगाराच्या अड्डयांवर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.            पनवेल परिसरात अनेक जुगाराचे अड्डे बसतात. या जुगार अड्डयांवर पोलीस वेळोवेळी कारवाई करतात. परंतु आदई येथील जुगार चालकाने वेगळीच शक्कल लढविली आहे. आपल्या जुगाराच्या अड्डयावर कारवाई होवू नये म्हणून वेळोवेळी या जुगार अड्डयाची जागा बदलली जाते. कधी डोंगराच्या कडेला, तर कधी झाडी झुडपात जुगार अड्डा भरवला जातो. पोलिसांवर नजर ठेवण्यासाठी दोन मुलांची नेमणूक करण्यात आली आहे. या जुगारात रोज लाखो रुपयांची उलाढाल होते. खांदेश्वर पोलिसांनी अनेक वेळा या जुगार अड्डयावर छापा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु सततच्या जागा बदलल्यामुळे पोलिसांना चकमा देण्यात या जुगार चालकाला यश आले आहे. त्यामुळे या जुगाराच्या अड्डयांवर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. त्यामुळे या जुगारावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना जंग जंग पछाडावे लागणार आहे. खांदेश्वर पोलिसांना या अड्डयावर कारवाई करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे यात शंका नाही. अनेकजण या जुगारापायी बर्बाद झाले आहेत. अनेकांचे संसार या जुगारामुळे देशोधडीला लागले आहेत आणि त्यामुळेच जुगार हा बेकायदेशीर - ठरविण्यात आला आहे. तरी सुध्दा पनवेल परिसरात अनेक जुगार खुलेआम सुरु आहेत. राज्यात जुगाराला बंदी आहे. अशा जुगार भरविणारे तसेच खेळणारेही शिक्षेस पात्र ठरतात. परंतु या जुगार अड्डयांवर होत असलेल्या थातूरमातूर कारवाई केली जाते. ही कारवाई कठोर पध्दतीने होणे गरजेचे आहे. एखाद्या जुगार अड्यावर कठोर कारवाई झाल्यास अनेक जुगार भरविणाऱ्यांना धडकी बसेल व हे धंदे करताना विचार करावा लागेल. याचा पोलिसांनी गांभिर्याने विचार करावा लागेल.


थोडे नवीन जरा जुने