जे एन पी ए च्या नवनियुक्त सेक्रेटरी मनीषा जाधव यांची मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन केले अभिनंदन.जे एन पी ए च्या नवनियुक्त सेक्रेटरी मनीषा जाधव यांची मनसे पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन केले अभिनंदन.
उरण दि १८(विठ्ठल ममताबादे )
जे एन पी ए च्या सेक्रेटरी व वरिष्ठ प्रबंधकपदी मनीषा जाधव यांची नियुक्ती झाली बंदराच्या ३४ वर्षाच्या कारकिर्दीत या पदावर पहिल्यांदाच महिला विराजमान झाली आहे. या आधी त्या पर्सनल व इंडस्ट्रियल रिलेशन व्यवस्थापक पदी त्या कार्यरत होत्या. मे अखेरीस जयवंत ढवळे सेक्रेटरी पदावरून निवृत्त झाले.


 त्या रिक्त झालेल्या जागी मनीषा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली त्यांनी या पदाची सूत्रे शुक्रवारी हाती घेतली. मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश ठाकूर आणि मनसेचे पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.  थोडे नवीन जरा जुने