उरण दि 2 ( विठ्ठल ममताबादे ) उरण तालुक्यातील चिर्ले ग्रामपंचायतचे सदस्य राजेश ज्ञानेश्वर पाटील हे समाजात नेहमी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. राजेश पाटील यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून श्री राजेश पाटील मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळ, जांभूळ पाडा, गावठाण चिर्ले यांच्या वतीने रविवार दि 7 मे 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हनुमान मंदिर,मराठी शाळा जांभूळपाडा येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी जास्तीत जास्त नागरिकांनी, इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.इच्छुक रक्तदात्यांनी
मंगेश पाटील - 7021609229
कांचन पाटील - 8446220832
गणेश पाटील - 8169048352
आशीष मोहिते - 7021908379
यांच्याशी संपर्क साधावे.
Tags
उरण