जे.एम.बक्षी पोर्ट मध्ये गुजराती कामगारांचा भरणाजे.एम.बक्षी पोर्ट मध्ये गुजराती कामगारांचा भरणाउरण दि 9(विठ्ठल ममताबादे )
 काही महिन्यांपूर्वी जवाहरलाल नेहरू बंदरातील कंटेनर टर्मिनलचे खाजगीकरण झाले व देशातील हे एकमेव सरकारी टर्मिनल 30 वर्षासाठी जे. एम. बक्षी कंपनीकडे हस्तांतर झाले. त्यांनी त्यांचा धंदा सुरू केला व आतापर्यंत 80 हजार कंटेनरची हाताळणी केली. तेथे जे कामगार भरण्यात आले त्यामध्ये गुजराती कामगारांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे. क्रेन दुरुस्ती विभागात प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना डावलून आता पर्यंत 25 कामगार गुजराती कामगार भरले आहेत या बाबत कामगार नेते व माजी विश्वस्त कॉ.भूषण पाटील यांनी आवाज उठविला आहे. अनुभवी व शिक्षित प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगार उपलब्ध असून देखील त्यांना डावलण्यात आले आहे. सदर गुजराती कामगार कोणाच्या शिफारशीनुसार भरले याची चौकशी व्हावी व त्यांना ताबडतोब काढून त्यांचे जागेवर प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना नोकर्‍या देण्यात याव्या मागणी भूषण पाटील यांनी केली. ताबडतोब जेएनपीटी प्रशासनाने त्यांचे सोबत मिटींग लाऊन कारवाई करावी व तसे न केल्यास जेएनपीटी प्रशासन भवना समोर आंदोलन करण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांचेवर जेएनपीटी प्रशासनाचे नियंत्रण नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जेएनपीटी प्रशासनाने त्यांना दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या व स्थानिकांच्या नावाच्या याद्या त्यांनी केराच्या टोपलीत टाकल्या आहेत असे ते म्हणाले. या पूर्वी दुबई पोर्टच्या आयजिटी टर्मिनल मध्ये अश्याच प्रकारे प्रकल्पग्रस्तांना व स्थानिकांना डावलून गुजराती व तामिळ कामगार भरले आहेत.


थोडे नवीन जरा जुने