उरण मध्ये फुटबॉल उन्हाळी प्रशिक्षण शिबीर.
उरण मध्ये फुटबॉल उन्हाळी प्रशिक्षण शिबीर.उरण दि २८(विठ्ठल ममताबादे )
आजकाल आपण पाहतो प्रत्येक घरा घरात मुले व मुली टीवी बघण्यात व मोबाईल गेम खेळण्यात मग्न आहेत त्यांना बाहेर जाऊन मैदाना वर खेळण्याची जराही आवड राहिली नाही, त्या व्यतिरिक्त मुलांना बाहेरचे खाण्याची आवड जास्त असते. पालक हि आपआपल्या कामामुळे मुलांकडे जास्त लक्ष देऊ शकत नाहीत. तेव्हा अशा मुलांमध्ये पाहण्यात आले आहे कि कमी वयातच त्यांना काही आजारांशी, रोगांशी सामना करावा लागत आहे.
"नियमित न खेळल्यामुळे किंवा व्यायाम न केल्या मुळे युनिसेफ चा रिपोर्टनुसार भारतीय मुलांमध्ये जास्त प्रमाणात चिंता करणे, लठ्ठपणा चे विकार, अस्थमा, आचरण विकार, नैराश्य, खाण्याचे विकार, बौद्धिक अपंगत्व मानसिक विकार आणि तारुण्याचे विकार पाहायला मिळत आहेत" या गोष्टींचं गांभीर्य मुलांना कळावे व मुलांची आवड मैदान व मैदानी खेळांकडे निर्माण व्हावी या साठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व लायन्स क्लब इंटरनॅशनल उरण अंतर्गत उरण मधील विध्यार्थ्यासाठी उरण येथे दिनांक १ जुन ते १० जुन २०२३ रोजी फुटबॉल खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर ठेवण्यात आले आहे. क्रीडा शिक्षक व फुटबॉल प्रशिक्षक प्रवीण तोगरे सर व विविध फुटबॉल प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दहा दिवसांच्या या फुटबॉल प्रशिक्षणा मध्ये हेल्थ ऍण्ड फिटनेस, डाइट ॲड न्यूट्रिशन, स्पोर्टस इन्जुरी, प्रथमोपचार, शरीराचा सर्वागीण विकास या संदर्भात मूलभूत ज्ञान देण्यात येणार आहे. प्रति दिवस सकाळी ८ ते १० असे दोन तासांचे सत्र असतील. ५ वर्ष ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुली या शिबिरात भाग घेऊ शकतात.प्रथम येणाऱ्या फक्त २५ विध्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व मुलांना मुलींना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड व लायन्स क्लब इंटरनॅशनल उरण मार्फत सर्टिफिकेट व उत्तम विद्यार्थ्यांना ट्रॉफी दिले जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क - फुटबॉल क्रीडा प्रशिक्षक प्रवीण तोगरे - 9920626547 यांच्याशी संपर्क साधावे.असे आवाहन करण्यात आले आहे.


थोडे नवीन जरा जुने