अपघात ठिकाण व वेळ*-: आज दि.18/05/2023 रोजी संध्याकाळी 19:00 वा.चे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे रोडवर मुंबई लेनवर कि.मी.28/800 खालापूर पोलीस ठाणे हद्दीत प्राणांतिक अपघात घडलेला आहे.
प्राणांकित अपघात
*अपघातातील वाहन*
1) क्रेटा कार क्र. MH 01 DP 5444
*अपघातचे कारण-*:- ता.म वेळी व जागी यातील क्रेटा कार क्र. MH 01 DP 5444 या वाहनावरील चालक आशिष तेजराज जैन वय.40 रा.1701,अर्थ कॅस्टल, सिकानगर,व्हि.पी.रोड,गिरगाव मुंबई-4 मो.9820076855 हे त्यांचे ताब्यातील क्रेटा कार घेऊन पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाने मुंबई बाजूकडे चालवित घेऊन जात असताना किमी.28/800 येथे तीव्र वळण रस्त्यावर आले
असता रस्त्याची परिस्थिती न पाहता वेगात वाहन चालविल्यामुळे त्यांचा त्यांचे वाहनावरील सुटल्यामुळे क्रेटा कार उजव्या बाजूचे रेलिंगला जोरात धडकून रेलिंग तोडून गार्डन डिव्हायडर मधून पुणे लेनची ही रेलिंग तोडून पुणे लेनवर जाऊन पलटी होऊन अपघात झाला आहे .
सदर अपघातात *1) मीनल आशिष जैन वय.36 वर्षे रा.1701,अर्थ कॅस्टल,सिकानगर,व्हि.पी.रोड,गिरगाव मुंबई-4 यांचे डोक्याला व पोटाला अंतरिक गंभीर दुखापती झाल्यामुळे आय आर बी रुग्णवाहिके मधील डॉक्टर सिद्धेश भटकळ यांनी रुग्णवाहिके मध्ये घेऊन तपासले असता त्या जागेवर मयत झाल्याचे सांगितले आहे* तसेच 2) मानवी आशिष चैन वय.12 वर्षे हिचे डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
कारमधील 3)चालक आशिष तेजराज जैन वय.40वर्षे व 4)हितांश आशिष जैन वय.9 वर्षे यांना किरकोळ दुखापती झालेल्या आहेत. सर्व जखमींना रुग्णवाहिकेमधून एमजीएम हॉस्पिटल येथे दवाउपचाराकरिता तात्काळ नेण्यात आले होते. सदरची कार सुरक्षितरित्या पुणे लेनवर रस्त्याच्या डावे बाजूला घेण्यात आली असून सदर ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव कोन लावण्यात आले आहेत.
*सदर कारच्या अपघातानंतर उजव्या बाजूकडील एअर बॅग खुल्या झालेल्या आहेत तसेच कारचा पुढील उजव्या बाजूचा टायर पूर्णतः फुटलेला असून डाव्या बाजूचा टायर सुस्थितीत आहे व पाठीमागील दोन्ही टायर पंचर झाल्याचे दिसून येत आहे.*
सदर ठिकाणी वाहतूक सुरळीत चालू केली आहे.अपघाताच्या ठिकाणी आम्ही स्वत: पोउपनि/बुरकुल, पोउपनि/केसरकर म.पो.केंद्र पळस्पे मोबाईल स्टाफसह हजर होतो. तसेच सदर ठिकाणी आरटीओ विभागाचे अधिकारी व स्टाफ आणि आय.आर.बी.कंपनीचा स्टाफ हजर होते.
Tags
खालापूर