पावसाळ्यापूर्वी कुंभारवाड्यातील वीजेची समस्या निवारणाची शिवसेनेची महावितरणाकडे मागणी







पावसाळ्यापूर्वी कुंभारवाड्यातील वीजेची समस्या निवारणाची शिवसेनेची महावितरणाकडे मागणी
पनवेल दि.२४ (संजय कदम) : पनवेल कुंभारवाडा परिसरात वीजेला होल्टेजचे प्रमाण फार कमी असुन त्यामुळे अनेक वेळेस नागरिकांच्या घरातील विजेचे उपकरणे हे निकृष्ठ झालेले आहेत. 



त्यामुळे पावसाळापूर्वी नागरिकांचा याचा त्रास होऊ नये म्हणून पावसाळ्यापूर्वी कुंभारवाड्यातील वीजेची समस्या निवारण करा अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख आशिष पनवेलकर यांनी महावितरणाकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन त्यांनी पनवेल एमएसइबी उपकार्यकारी अभियंता यांना दिली आहे. यावेळी पनवेल शहरशहर प्रसाद सोनावणे, उपशाखा प्रमुख प्रतीक वाजेकर उपस्थित होते.




            यासंदभार्त आशिष पनवेलकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पनवेल कुंभारवाडा येथील वीजेची समस्या फार दिवसांपासुन प्रलंबित आहे. येथील वीजेला होल्टेजचे प्रमाण हे फार कमी असुन अनेक वेळेस विजेचे उपकरणे हे निकृष्ठ झालेले आहेत. त्यासाठी स्वतंत्र वीजेच्या उपकरणामार्फत उपाययोजना येथील नागरिकांना करून देणे आवश्यक आहे. तसेच पावसाळयामध्ये निर्माण होणारी वीजेची वायरींग ची समस्या असल्यामुळे पावसाळयामध्ये चक्क वीजेच्या ठिणग्या निघतात त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे असे म्हटले आहे. 


थोडे नवीन जरा जुने