बिमा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील झुडपामध्ये आढळला इसमाचा मृतदेह
बिमा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील झुडपामध्ये आढळला इसमाचा मृतदेह
पनवेल दि.०४ (वार्ताहर) : कळंबोलीतील बिमा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील झुडपामध्ये एका अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली आहे. कळंबोली पोलिसांनी या मृत व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेत आहेत. 


           सदर इसमाचे अंदाजे वय २५ ते ३० वर्षे आहे. कळंबोली पोलिसांना या व्यक्तीजवळ त्याची ओळख पटविण्यासारखी कुठलीही वस्तू आढळून आली नाही. त्यामुळे या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


थोडे नवीन जरा जुने