हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हाचिपळे येथे चौघांना चाकू, लोखंडी रोड व बांबूने मारहाण केल्या प्रकरणी आठ जणांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हाचिपळे येथे चौघांना चाकू, लोखंडी रोड व बांबूने मारहाण केल्या प्रकरणी आठ जणांविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चिपळे जवळील मिश्रा यांच्या फार्म हाऊसवर वॉचमन शेलार यांना बाजे येथील बांधकाम करण्यासाठी कधी येणार हे विचारण्यासाठी सनील कुमार
नायर (५८, कोप्रोली) हे गेले होते. यावेळी नायर यांना फार्म हाऊस मधून सलीम ताडे यांच्या घरी पाण्याच्या टाकीत पाणी जाताना दिसले. त्याबाबत त्यांनी


वॉचमन यांना तुम्ही सलीम ताडे यांना पाणी देता, आम्हाला का देत नाही असे बोलले असता शेजारी असणारा सलीम ताडे हा घरातुन बाहेर आला आणि
आम्ही पाणी घेतो तुम्हाला काय तकलीफ आहे असे बोलून शिवीगाळ केली. यावेळी तुमच्या नादी कोण लागते, तुम्ही निघून जा, मी वॉचमेन सोबत बोलतोय


असे सलीम तांडे यांना सनिल बोलले. या गोष्टीचा राग आल्याने सलीम ताडे याने त्याच्या मटन शॉपमध्ये काम करणारे सैफ, अब्दुल शहा व त्यांची चार
मुले त्यांना जमा केले व सनिल नायर, बिनिश नायर, शिनिश नायर, सीजीस नायर यांना चाकू व लोखंडी रोड व बांबूने मारहाण केली. यात ते जखमी झाले.


त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात सलीम मामू ताडे, त्यांची पत्नी, कैफ ताडे, शाहरुख ताडे, शाकीप ताडे,
अब्दुल शहा, सैफ, व अन्य दोन अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान हा गुन्हा
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.


थोडे नवीन जरा जुने