कळंबोलीत एका इसमाची निघृण हत्या; परिसरात उडाली खळबळ
पनवेल दि.०८ (संजय कदम) : कळंबोली वसाहतीमध्ये एका इसमाची अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने सेक्टर ४ मधील उद्यानात आज पहाटेच्या सुमारास हत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे
मयत इसमाने नाव यशपाल सिंग खासा (वय ४१) असे असून आज पहाटेच्या सुमारास अज्ञात कारणावरून अज्ञात इसमांनी त्याच्या राहत्या घराबाहेरील सेक्टर ४ मधील उद्यानात धारदार शस्त्राने हत्या केली. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे व कळंबोली पोलिसांचे पथक यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. त्यांनतर त्यांनी परिसरातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले
. पोलिसांनी परिसरातील स्थानिक नागरिकांकडून घटनेची चौकशी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज हस्तगत केले आहे. त्यामुळे लवकरच या गुन्हाचा छडा लावू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Tags
कळंबोली