पनवेल एजुकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी इक्बाल हुसैन काझी यांची सलग तिसऱ्यांदा निवड







पनवेल एजुकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी इक्बाल हुसैन काझी यांची सलग तिसऱ्यांदा निवड
पनवेल दि.१५(संजय कदम): पनवेलमधील शिक्षण क्षेत्रात प्रसिध्द पनवेल एजुकेशन सोसायटीची निवडणूक नुकतीच संपन्न होवून इक्बाल हुसैन काझी यांच्या अध्यक्षतेखालील पॅनल निवडून आले होते. नवीन कार्यकारी मंडळाची सभा नुकतीच संस्थेच्या याकुब बेग हायस्कूल येथील कार्यालयात संपन्न झाली. त्यामध्ये इक्बाल हुसैन काझी यांची बिनविरोध निवड करण्यात आली . त्यानंतर झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेमध्ये उपाध्यक्षपदी मा.नगरसेवक अब्दुल मुकीत अब्दुल लतीफ काझी यांची निवड करण्यात आली आहे.



      संस्थेच्या घटनेनुसार मोहम्मद नूर हसनमिया पटेल व अलीम अमिरुद्दिन पटेल असे दोन सचिव तसेच खजिनदारपदी माज शाहनवाझ मुल्ला यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या घटनेनुसार दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येत असते. 



त्यामध्ये तळोजा येथील जव्वाद मन्सूर पटेल यांची तर बारापाडा येथील यासिर रईस दाखवे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. पनवेल मधील याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज कॅम्पस साठी चेअरमन म्हणून असिफ हसन करेल यांची, तळोजा येथील नेशनल उर्दू हायस्कूल कॅम्पस चेअरमन पदावर साजिद नासीर पटेल यांची तर अंगलो उर्दू हायस्कूल बारापाडाच्या चेअरमनपदी नवीद अब्दुल कादिर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली. पनवेल एजुकेशन सोसायटीच्या नवनिर्वाचित अध्यक्षांचे तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



थोडे नवीन जरा जुने