प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा






प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा
महानगरपालिकेच्या नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व ४ आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी कामासाठी कटिबध्द राहण्यासाठीची प्रतिज्ञाना सर्व परिचारिकांनी घेतली.


आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र १ गावदेवी पनवेल याठिकाणी अक्सिस बँक ताइदेव शाखेने परिचारिकांचा सन्मान केला. यावेळी बँकेचे साहाय्यक व्यवस्थापक चंद्रेश गौड उपस्थित होते. तसेच वैद्यकिय अधिकारी डॉ. रेहाना मुजावर, डॉ. अनिल पाटील, सर्व परिचारिका उपस्थित होत्या.


रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा


केला जातो. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस 'जागतिक परिचारिका दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. फ्लोरेन्स

नायटिंगल यांनी आधुनिक नर्सिंगचा पाया रचला. त्यांच्याच स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो..


थोडे नवीन जरा जुने