ग्रामस्थांच्या हिताचे सकारात्मक निर्णय होत नाही तो पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही नको - आमदार महेश बालदी








ग्रामस्थांच्या हिताचे सकारात्मक निर्णय होत नाही तो पर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही नको - आमदार महेश बालदी 

पनवेल(प्रतिनिधी) जो पर्यंत पुनाडे, वशेणी व सारडे येथील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हिताचे सकारात्मक निर्णय होत नाही तो पर्यंत शासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू नये, असे आमदार महेश बालदी यांनी प्रांताधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत ठाम भूमिका मांडली.


 
           महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिकीकरणासाठी उरणमधील पुनाडे, वशेणी व सारडे या तीन गावातील जमीन संपादनाची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन या संदर्भात लक्ष घालण्याची विनंती केली. या संदभात आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार प्रांताधिकारी राहुल मुंडके आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. या बैठकीस एमआयडीसीचे विभागीय अधिकारी डॉ. संतोष थिटे, उरणचे तहसीलदार श्री. कदम,, सारडे, वशेणी व पुनाडे गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते. 


            यावेळी झालेल्या बैठकीत आमदार महेश बालदी यांनी ग्रामस्थांच्या भावना मांडल्या. संपादनाच्या अनुषंगाने जमीन किती संपादित करणार, शेतकऱ्यांना मोबदला किती असणार, पुनर्वसन पॅकेज काय असणार, नोकरी व्यवस्था कशी असणार, सार्वजनिक सुविधा कशा देणार, आणि या अनुषंगाने संपूर्ण धोरण काय असणार याची पूर्ण माहिती मिळाल्याशिवाय आणि शेतकऱ्यांचे ग्रामस्थांचे समाधान होत नाही तो पर्यंत संपादनाची कोणतीच कार्यवाही करू देणार नाही, असेही आमदार महेश बालदी यांनी ग्रामस्थांची भूमिका मांडताना अधोरेखित केले. 
यावेळी प्रांताधिकारी राहुल मुंडके यांनी शासन स्तरावर सदरची भूमिका मांडणार असल्याचे आश्वासन दिले. 



थोडे नवीन जरा जुने