लॉटरीच्या दुकानात चोरीलॉटरीच्या दुकानात चोरी
पनवेल शहरातील एका लॉटरीचे दुकान फोडून त्यातून रोख रक्कम व टॅबसह २२ हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेले आहे. याविषयी पनवेल शहर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पनवेलमध्ये राहणाऱ्या अनिल पाटील यांचे शिवाजी चौकात लॉटरीचे दुकान आहे. नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले असता रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून पैशांच्या लॉकरमधील १ हजार रुपये, टॅब, नाणी असे २२ हजार रूपयांचे साहित्य चोरून नेले. दुसऱ्या दिवशी दुकान उघडण्यासाठी गेले असताना त्यांना हि चोरी झाल्याचे दिसून आले. याविषयी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल पोलिस पुढील तपास करत आहेत
थोडे नवीन जरा जुने