पनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील खुटारी येथे अज्ञात चोरटयाने उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करुन मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालक शाहरुख मोहम्मद इरसाद खान (वय 25) ह्याच्या खुटारी येथील राहत्या घरी अज्ञात चोरट्याने पहाटेच्या सुमारास उघड्या दरवाजावाटे आत प्रवेश करुन १० हजार रुपये किमतीचा ओपो F11 प्रो कंपनीचा मोबाईल आणि 800 रुपये किमतीचा फायर बोल्ट लिंझा 3 स्मार्ट वॉच चोरून नेला. याप्रकरणी शाहरुख यांनी तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Tags
पनवेल