स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांची बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थितीस्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांची बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थिती
पनवेल दि.०६ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांना स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी उपस्थिती दर्शवत भगवान गौतम बौद्ध यांना नमन केले. 


                भगवान गौतम बुद्ध यांची जयंती अर्थात बौद्धपौर्णिमा तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जासई येथे संयुक्त जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून महेश साळुंखे यांनी उपस्थिती दर्शविली तसेच करंजाडे बुद्धविहार, पनवेल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमाना भेट दिली. तसेच बौद्धपौर्णिमेनिमित्त कर्जत येथे शितल ज्ञानेश्वर कांबळे यांनी आपल्या नवीन घराचे गृहप्रवेश सोहळा आयोजित केला होता यावेळी महेश साळुंखे यांनी भेट देत शीतल कांबळे यांना शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे बौद्धपौर्णिमा निमित्त विविध ठिकाणी पक्षाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांना आगामी येणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेविषयी मार्गदर्शन केले.
फोटो : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांची बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रमांना उपस्थितीथोडे नवीन जरा जुने