ऑनलाईन खुर्च्या व टेबल मागवणाच्या प्रयत्नात एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक





ऑनलाईन खुर्च्या व टेबल मागवणाच्या प्रयत्नात एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक 
पनवेल दि. १० ( वार्ताहर ) : ऑनलाईन खुर्च्या व टेबल मागवणाच्या प्रयत्नात असलेल्या कामोठे भागातील एका महिलेला सायबर चोरट्यांनी ॲपच्या माध्यमातून बँक खात्यातून १ लाख १६ हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.


                   कामोठे भागात राहणाऱ्या ग्रेसी लुंकोस (६१) यांनी गत आठवड्यामध्ये आपल्या दुकानाकरिता ऑनलाईन १० खुर्च्या व ५ टेबल खरेदी केल्या होत्या. ३ मे रोजी त्यांना खुर्च्या मिळणार होत्या. मात्र त्यांचे पार्सल त्यांना न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी गुगलवरून हेल्पलाईन नंबर शोधून त्यावर संपर्क साधला होता. हा नंबर सायबर गुन्हेगारांच्या टोळीचा असल्याने त्यांनी ग्रेसी यांना पैसे भरल्यानंतर पार्सल मिळेल असे सांगितले. 


तसेच सायबर चोरट्याने ग्रेसी यांना अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. ग्रेसी यांनी त्यानुसार केले असता चोरट्याने अॅपच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून ९९ हजार व १७ हजार अशी एकूण १ लाख १६ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी सायंकाळी ग्रेसी यांच्या मोबाईलवर याबाबतचा मेसेज आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.


थोडे नवीन जरा जुने