काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्यांचा कार्य हे कौतुकास्पद आहे - महेंद्र शेठ घरत





काँग्रेस पक्षाच्या युवा नेत्यांचा कार्य हे कौतुकास्पद आहे महेंद्र शेठ घरत
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे ) 7 मे 2023 रोजी ग्रुप ग्रामपंचायत चिरले चे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजेश ज्ञानेश्वर पाटील ( जांभूळपाडा ) यांच्या पुढाकारातून जांभूळपाडा येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.या शिबिराचे उदघाटन रायगड जिल्हा काँग्रेसचे डॅशिंग अध्यक्ष, तथा कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले


.यावेळी महेंद्र शेठ घरत यांनी आपल्या मनोगता मध्ये बोलताना सांगितलं की राजेश पाटील यांनी पुढाकार घेउन भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल राजेश पाटील आणि सहकार्यांचा मनापासून अभिनंदन तसेच काँग्रेस पक्षाचे उरण तालुक्यातील बहुतांश युवा नेते समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जोपासून चांगलं कार्य करत आहेत त्याबद्दल कुटुंबप्रमुख म्हणून मला त्या सर्व युवा नेत्यांचे कार्यकर्त्यांचं अभिमान वाटत आहे.येणाऱ्या काळामध्ये ग्रुप ग्रामपंचायत चिरले येथे भव्य असं आरोग्य शिबिर व भव्य रोजगार मेळावा आयोजित करावे असे महेंद्र शेठ घरत यांनी सांगितले.


 माझा एक उद्देश आहे की आज पर्यंत आपण अनेकांना नवीन नोकऱ्या देण्याचं कार्य करत आहोत म्हणून रोजगार मेळाव्यातून दरवर्ष 200 ते 300 नवीन नोकऱ्या तरुणांना मिळावा हा माझा उद्देश आहे आणि आरोग्य शिबिरातून अनेक ज्येष्ठ मंडळींसाठी चष्मे किंवा अन्य गोष्टी मिळाव्या हा आपला उद्देश आहे असे महेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले


.शेवटी बोलताना राजेश पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन महेंद्र घरत यांनी आयोजकांचे तोंड भरून कौतुक केले.या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर मनीष पाटील, जासई विभाग काँग्रेस अध्यक्ष विनोद पाटील, उपसरपंच राजन पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य रंजिता पाटील, काँग्रेस कार्यकर्ते जितेंद्र पाटील, हरिचंद्र पाटील, दिनकर पाटील, महेश पाटील, किरण भगत, महेश गोंधळी,



 विशाल, गोंधळी, गणेश पाटील, कांचन पाटील,डी वाय पाटील हॉस्पिटलचे डॉक्टर, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महिला भगिनी आणि शिबिरासाठी रक्तदान करण्यासाठी आलेले अनेक रक्तदाते मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.एकूण 38 रक्तदान झाले.



थोडे नवीन जरा जुने