पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश








पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश
पनवेल दि.२४ (संजय कदम) : खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दत्तात्रय कोकाटे यांची कन्या श्रुती सुभाष कोकाटे हिने अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश संपादन केले आहे. तिने संपूर्ण भारतातून ६०८ क्रमांक पटकावले आहे. याबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारबे यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षा २०२२ चा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, केंद्रीय सेवा गट अ, गट ब अशा पदांसाठी नागरी सेवा परीक्षा २०२२ घेण्यात आली होती. यूपीएससीने जाहीर केलेल्या निकालामध्ये नुकतेच खान्देश्वर पोलीस ठाण्यामधून खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून पदोन्नती झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांची कन्या श्रुती सुभाष कोकाटे हिने सुयश प्राप्त केले आहे. 



आपल्या वडिलांप्रमाणे देशासाठी सेवा करण्याची इच्छा बाळगणारी श्रुती हिने संपूर्ण भारतातून ६०८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण नवी मुंबई पोलीस दलात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. श्रुतीच्या या यशाबद्दल नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारबे यांनी तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




थोडे नवीन जरा जुने