आयएनआयएफडी पनवेल तर्फे सोल सेन्सेशन 4.0 कार्यक्रमाचे आयोजन
आयएनआयएफडी पनवेल तर्फे सोल सेन्सेशन 4.0 कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल दि.०६ (वार्ताहर) : आयएनआयएफडी, पनवेल तर्फे 9 जून रोजी आकुर्ली येथील काकाजीनी वाडी येथे सोल सेन्सेशन 4.0 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ संदीप कोचर, अमन वर्मा, कॉमेडियन विकल्प मेहता, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, आयएनआयएफडीचे सीईओ आणि संस्थापक अनिल खोसला, मुख्य प्रायोजक - इंद्रावती हॉस्पिटल्स, ऐरोली मधुसूदन डेअरी, आदित्य बिर्ला ग्रुप - ग्रासिम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सोल सेन्सेशन 4.0 हा आयएनआयएफडी पनवेलच्या नवोदित विद्यार्थी डिझायनर चा मेगा फॅशन इव्हेंट आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पदवीधर बॅचने मांडलेला हा शो आहे. या विद्यार्थ्यांनी यापूर्वी लॅक्मे फॅशन विक, न्यूयॉर्क फॅशन विक आणि लंडन फॅशन विक यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय शोमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांचे कलेक्शन प्रदर्शित केले आहे 

. फॅशन डिझायनर ने त्याच्या /तिच्या आगामी कपड्यांची ओळ दर्शवण्यासाठी केलेला हा कार्यक्रम आहे. ज्यामध्ये अनेक कलात्मक घटक जोडले गेले आहेत. जे फॅशन क्षेत्रातील नवीनतम फॅशन ट्रेंड लक्षात घेऊन त्याचे कौतुकाचे मूल्य मजबूत करतात. आय एन आय एफ डी पनवेलची सुरुवात आठ वर्षांपूर्वी झाली. येथे विद्यार्थ्यांना मोफत सेलिब्रिटी कार्यशाळा आणि औद्योगिक भेट दिली जाते. आकुर्ली, पनवेल येथे होणाऱ्या कार्यक्रमात जवळपास 2000 जण सहभागी होणार आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयएनआयएफडीचे डायरेकटर सुरींदर सिंग यांनी केले आहे.थोडे नवीन जरा जुने