राजर्षि शाहू विचार वारसा विषयावर व्याख्यान


राजर्षि शाहू विचार वारसा' विषयावर व्याख्यान

पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची नाममुद्रा उमटविणारे राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
शनिवार दि. २४ जून २०२३ रोजी सायं ६. ३० वा. राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या १४व्या जयंतीनिमित्त राजर्षि छत्रपती शाहू' मालिकेत छत्रपती शाहू महाराजांची भूमिका साकारणारे सुप्रसिध्द अभिनेते व नामवंत व्याख्याते राहूल सोलापूरकर हे 'राजर्षि शाहू विचार वारसा' या विषयावर व्याख्यानातून शाहू महाराजांचा जीवनपट व विचार मांडणार आहेत.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर १५, ऐरोली येथे उभारण्यात आलेले भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे बाबासाहेबांच्या 'ज्ञान हीच 'शक्ती' या विचारसूत्रावर आधारित ज्ञानस्मारक म्हणून नावाजले जात असून या ठिकाणी विविध विषयांवर नामवंत वक्त्यांची व्याख्याने आयोजित करून नागरिकांना वैचारिक मेजवानी उपलब्ध करुन दिली जात आहे. 'विचारवेध' श्रृंखलेअंतर्गत आयोजित कार्यक्रमांना तसेच बाबासाहेबांच्या जयंतीनिमित आयोजित 'जागर' या विशेष व्याख्यानमालेला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे. हरितक्रांती, शिक्षणक्रांती, समताक्रांती, उद्योगक्रांती, जलक्रांती, श्वेतक्रांती घडवित आधुनिक विज्ञाननिष्ठ समाजक्रांतीचे उद्गाते असणा-या राजर्षि छत्रपतीशाहू महाराज यांच्या सर्वस्पर्शी कार्याला अभिवादन करण्यासाठी व त्यांचे विविध क्षेत्रातील अतुलनीय कार्य जाणून घेण्यासाठी दिनांक २४ जून २०२३ रोजी, ऐरोली मुलुंड खाडीपुलाजवळील, सेक्टर १५, ऐरोली येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृहात सायं. ६.३० वा. सुप्रसिध्द अभिनेते व नामवंत व्याख्याते राहूल सोलापूरकर यांच्या आयोजित करण्यात आलेल्या 'राजर्षि शाहू विचार वारसा' या व्याख्यानाप्रसंगी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.


थोडे नवीन जरा जुने