जसखार गावच्या विविध समस्यावर जेएनपीए प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा.
समस्या सोडविण्याचे जेएनपीए प्रशासनातर्फे आश्वासन.
उरण दि २(विठ्ठल ममताबादे )दिनांक २ जून २०२३ रोजी जे एन पी टी प्रशासन भवन येथे डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ आणि सचिव मनीषा जाधव यांच्या सोबत जसखार गावाला भेडसावणाऱ्या अनेक समस्या आहेत त्या समस्या निवारण साठी उपसरपंच ग्रामपंचायत प्रणाली म्हात्रे आणि ग्रामपंचायत सर्व महिला सदस्या यांच्या अध्यक्षतेखाली जे एन पी टी व्यवस्थापन यांच्या वतीने मीटिंग बोलवण्यात आली.त्या मीटिंग मध्ये खालील विषयावर चर्चा झाली
२)बी एम सी टी (पी एस ए.)पोर्ट मध्ये ज्यांची घरे उध्वस्त झाली होती त्या तिन्ही घरा च्या एका तरुणाला त्वरित नोकरी मिळावी
३) ग्रामपंचायत हद्दित येणाऱ्या सर्व प्रकल्प यामध्ये जसखार गावातील तरुणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळण्यासाठी प्राधान्य मिळण्यात यावे.
४) जसखार गावा सभोवताली चालू असलेल्या श्री रत्नेश्वरी देवी मंदिर रीपेरींग तसेच गटारे व नाल्या च्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र अधिकारी याची नेमणूक करून कामावर देखरेख ठेवावी.
अशा इतर अनेक जसखार गावाला भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली.डेप्युटी चेअरमन याच्या वतीने या सर्व विषयावर सकारात्मक चर्चा झाली. काही कामे तातडीने पूर्ण करण्यास त्या त्या विभागातील अधिकारी वर्गाला आदेश देण्यात आले व नोकर भरती व नागरी सुविधा जसखार गावाला मिळण्यासाठी डेप्युटी चेअरमन जातीने लक्ष घालतील व सर्व प्रश्न लवकरच मार्गी लावतील असे प्रतिपादन केले.आणि सर्वोतपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या सर्व चर्चेत जसखार गावाच्या नेहमी पाठीशी असणारे जे एन पी टी विश्वस्त रवि पाटील,ग्रामपंचायत उपसरपंच प्रणाली किशोर म्हात्रे , धनवंती दिनेश ठाकुर, हेमलता भालचंद्र ठाकुर, दमयंती जनार्दन म्हात्रे ग्रामपंचायत सदस्या, संजय तांडेल अध्यक्ष ग्रामसुधारणा मंडळ , गणेश घरत नवघर जिल्हा परिषद विभाग प्रमुख नितीन पाटील माजी सरपंच, युवा सामाजिक संस्था अध्यक्ष, हर्षल ठाकुर,शिवसेना शाखा अध्यक्ष अमित ठाकुर, निलेश घरत भाजपा अध्यक्ष, भूषण ठाकुर अध्यक्ष शे. का.पक्ष, निशांत ठाकुर मनसे अध्यक्ष, प्रल्हाद पाटील राष्ट्रवादी काँग्रेस,युवा सामाजिक संस्थाच्या वतीने संदीप भोईर, मेघनाथ ठाकुर,रणजित पाटील, मयूर भोईर, नेते रणजित पाटील,सर्व जसखार ग्रामस्थ उपस्थित होते. आई रत्नेश्र्वरी देवीच्या आशीर्वादाने जसखार गावच्या सर्व समस्या लवकरच दूर होऊ दे अशी सर्वांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली.
आणि या सर्व मागण्या पूर्ण होई पर्यंत जे एन पी टी व्यवस्थापन याच्या सोबत मागण्या पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल असे प्रतिपादन अमित ठाकुर शाखा प्रमुख शिवसेना यांनी आमच्या पत्रकारांसोबत बोलताना सांगितले.
Tags
उरण