कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक








कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक 
पनवेल दि.०८ (संजय कदम) : सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेला असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आज पनवेल शहर पोलीस ठाणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विजय कादबाने यांनी उपस्थितांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. 



    सध्या महाराष्ट्रात सकल हिंदू समाजाचे भव्य मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियावर महपुरूषांच्या आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस समाजकंटकांकडून वायरल होत असल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.



 त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली आज शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी उपस्थितांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या तसेच काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी या बाबत सूचना केल्या. यावेळी शांतता कमिटीचे सदस्य जयंत पगडे, महेश साळुंखे, मुकीद काझी, पराग बालड, जवाद काझी, इम्तियाझ बेग, नावेद पटेल, मोझेस कोरलेकर, इमाउद्दीन देशमुख, प्रसाद म्हात्रे यांच्यासह गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव उपस्थित होते.   


             

थोडे नवीन जरा जुने