रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज. आ. भगर ज्युनिअर कॉलेज कोपर येथे पोलिस ठाणे व आशा की किरण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रम संपन्न
पनवेल दि. २४ ( संजय कदम ) : जागतिक अमली पदार्थ दिनाचे अनुषंगाने हद्दीतील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज. आ. भगर ज्युनिअर कॉलेज कोपर येथे पोलिस ठाणे व आशा की किरण सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ जनजागृतीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थी ,शिक्षक तसेच पालक व पोलीस ठाण्यातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते .
सदर कार्यक्रमात शाळेचे सुमारें ३०० विद्यार्थी ,शिक्षक तसेच पोलिस ठाणे कडील अंमलदार सहभाग घेतला होता . त्यावेळी उपस्थितांना न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ तसेच सामाजिक संस्थेचे बशीर भाई कुरेशी यांनी अमली पदार्थाचे दुष्परिणाम व तोटे व कायद्याबाबत मार्गदर्शन केले आणि व्यसनापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या.
Tags
पनवेल