शिवसेना नेते युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर येथे वृक्षारोपण


शिवसेना नेते युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर येथे वृक्षारोपण
पनवेल दि.१४ (संजय कदम) : शिवसेना नेते युवासेना प्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिव आरोग्य सेना पनवेल महानगर यांच्या वतीने खारघर येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
              आदित्य ठाकरे ह्यांनी नेहमी पर्यावरणाच्या दृष्टीने खूप उल्लेखनीय कार्य केले आहे, मग ते प्रदूषण विरोधी लढा असो चौपाटी जवळचे बीच स्वच्छता मोहीम असो पर्यावरण, वने संवर्धन कार्यक्रम असो ह्या सर्वामध्ये ते नेहमी अग्रेसर राहून सर्वांना ऊर्जा देत राहिले आहे आणि तरुणांना मार्गदर्शन करत असे कार्यक्रम घेण्यास प्रोत्साहित करत राहिले, त्यामुळेच त्यांचा पर्यावरण प्रेम पाहता त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना अनोखी भेट द्यावी ह्या हेतूने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवआरोग्य सेना अध्यक्ष शुभा राऊळ, कार्याध्यक्ष डॉ ठाणेकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक जितू सकपाळ ह्यांच्या सुचने नुसार शिव आरोग्य सेना पनवेल महानगर ह्यांच्या वतीने खारघर येथे वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अनोख्या पद्धतीत वाढदिवस साजरा करण्यात आला. 

ह्यावेळेस कार्यक्रमाचे आयोजक शिव आरोग्य सेना पनवेल महानगर समन्वयक डॉ परेश देशमुख यांच्यासमवेत शिव आरोग्य सेना खारघर चे मीनल गरुड,अमित राणे, राजेश्वरी पिल्लई, डॉ हर्शुला देशमुख, कामोठे शिव आरोग्य सेनेचे दीपक जाधव व इतर शिवसैनिक आणि स्थानिक रहिवासी उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने