जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी साजरा.
विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या शुभेच्छा
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष, कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे समाजात अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून मानले जातात. काँग्रेस कार्यकर्ते व कामगार यांच्यासाठी त्यांच्या वाढदिवस म्हणजे उत्सव. त्यांच्यावर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कामगार क्षेत्रातील नागरिक प्रेम करतात याचा प्रत्येय त्यांच्या वाढदिवसा दिवशी आला. ते समाजासाठी करत असलेल्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांचे मित्र, कार्यकर्ते, सहकारी यांनी त्यांचा वाढदिवस वेगवेगळ्या समाजपयोगी उपक्रमांनी साजरा केला.
धुतुम ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर, उपसरपंच कविता पाटील व सर्व सदस्य यांच्या तर्फे वृक्षारोपण, मोफत आरोग्य शिबीर व जेष्ठ नागरिकांना छत्रीवाटप कार्यक्रम करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजसेवक प्रेमनाथ ठाकूर, गांव अध्यक्ष शंकर ठाकूर, महिला तालुका उपाध्यक्षा निर्मला ठाकूर, कुंदन पाटील, अंगद ठाकूर, राजेश ठाकूर यांनी विशेष मेहनत घेतली.
पेण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे, अशोक मोकल, आर. जे म्हात्रे, वैभव म्हात्रे, धीरज पाटील यांच्या उपस्थितीत रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आला.तसेच न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटने तर्फे जेष्ठ गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांच्या सदाबहार गाण्यांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
महेंद्रशेठ घरत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, कुणाल महेंद्रशेठ घरत यांच्या सिद्धिविनायक बॅक्वेट व आगरी कट्टा रेस्टोरंटचे उदघाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नागराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, ओबीसी प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Tags
उरण