महिलेच्या गळ्यातील चेन खेचून चोर पसार
खारघर शहरातील हिरानंदिनी मार्केट चौक फिरायला गेलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील चैन पाठीमागून आलेल्या दोन इसमांनी हिसकावून नेल्याची घटना • घडली आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
७१ वर्षीय कलावती मौर्य ह्या हिंसनंदिनी मार्केट चौक येथे फिरायला गेल्या असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या दोन इसमांनी त्यांच्या गळ्यातील लॉकेटसह असलेली सोन्याची चैन खेचून पसार झाले आहेत.
त्यांच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. पनवेलमध्ये चेन खेचण्याचा प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे पोलिसांवरील दबाव वाढत असून चोऱ्यांचे प्रमाण रोखण्याचे आवाहन पोलिसांसमोर असणार आहे
02
Tags
पनवेल