पनवेल (प्रतिनिधी) देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून नऊ वर्षांत समाजातील सर्व घटकांसाठी कल्याणकारी कार्य करण्यात आले. त्या अनुषंगाने भाजपातर्फे राबविण्यात येणाऱ्या 'मोदी @९' कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने पनवेल विधानसभा भाजपच्यावतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज 'टिफिन बैठक' मोठ्या उत्साहात पार पडली.
या बैठकीस कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहेरे, अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, राजेश मपारा, पनवेल महापालिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी उपमहापौर सीताताई पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, जिल्हा प्रवक्ता प्रकाश बिनेदार,जेष्ठ नेते सी. सी. भगत, खालापूर संपर्क प्रमुख प्रल्हाद केणी, कामोठे सपर्क प्रमुख विनोद साबळे, पनवेल ग्रामीण संपर्क प्रमुख राजेश गायकर, उरण तालुका सरचिटणीस कैलास भोईर, खालापूर तालुका सरचिटणीस प्रवीण मोरे,
रोहा तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे उत्तर रायगड जिल्हा संयोजक नितीन कांदळगावकर, माजी नगरसेवक ऍड मनोज भुजबळ, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, संतोष भोईर, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, अॅडव्होकेट वृषाली वाघमारे, मोनिका महानवर, रुचिता लोंढे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, सुनील घरत, के. सी. पाटील, मनोहर म्हात्रे, बिना गोगरी, विद्याताई तामखेडे, महिला मोर्चा शहर अध्यक्ष वर्षा नाईक, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयूरेश नेतकर, तोंडरे माजी सरपंच राम पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती माजी सदस्य भूपेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, दुंदरेचे माजी उपसरपंच रमेश पाटील, अभिषेक पटवर्धन, अमरीश मोकल, राकेश गायकवाड, सय्यद अकबर, सतीश पाटील, अशोक मोटे, अशोक साळुंखे, यांच्यासह पदधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाने विधानसभा मतदारसंघानिहाय स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ‘टिफिन बैठक' चे आयोजन केले होते. या बैठकीच्या संकल्पनेनुसार आपआपल्या घरून जेवणाचा डबा आणून सामूहिक भोजन करण्यात आले तसेच चर्चात्मक संवाद साधण्यात आले. 'मोदी @९' कार्यक्रमांतर्गत महाजनसंपर्क अभियानाच्या अनुषंगाने, मोदी सरकारच्या काळात झालेल्या विकास कामांची माहिती देण्यासाठी 'विकास तिर्थ', डॉक्टर, शिक्षक, वकील, इंजिनिअर यांचे 'प्रबुद्ध नागरी संमेलन', प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मोदी सरकारला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठिंबा देणाऱ्यांचे 'सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर संमेलन', विशाल रॅली, जाहीर सभा, योग दिन, ज्येष्ठ कार्यकर्ता संमेलन, लाभार्थी संमेलन, व्यापारी संमेलन, व्हर्च्युअल रॅली, घरोघरी संपर्क अभियान, संयुक्त मोर्चा संमेलन अशी विविध कार्यक्रमे होणार आहेत.
Tags
पनवेल