भाजपाचे नेते विठ्ठल मोरे यांना मातृशोक


भाजपाचे नेते विठ्ठल मोरे यांना मातृशोक
काशिनाथ जाधव : प्रतिनिधी
पाताळगंगा : ३० जून,
एकेकाळी शिवसेनेचे डॅशिंग व निष्ठावंत विभागप्रमुख म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण खालापूर तालुक्यात होती.तेच विठ्ठल मोरे आज भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत.कोयना समाजाचे त्यांनी राज्यपातळीवर यशस्वी नेतृत्व केले आहे.हे सर्व शक्य झाले ते माझ्या आईच्या आशिर्वादामुळेच शक्य झाले असे मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या विठ्ठल मोरे यांना आईच्या निधनानंतर पोरके झाल्यासारखे वाटू लागले आहे.

वडवल(धवली) येथील शेतकरी रामजी मोरे यांच्या कुटुंबाची यशस्वी धुरा सांभाळणाऱ्या धोंडाबाई रामजी मोरे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांनी आपला शेवटचा श्वास घेतानाही आपल्या मुलांना एकीचे महत्व पटवून दिला.आज त्यांच्या पश्चात राजाराम, पांडुरंग व विठ्ठल अशी तीन मुले,मुली,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


वडील कै.रामजी व आई कै.धोंडाबाई यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केल्याने आज त्यांची मुले समाजात एक अत्यंत उंचीवर जाऊन पोहचली आहेत.मोठ्या भावाने सांगावे आणि लहान दोन्ही भावांनी त्यांचे पालन करावे अश्याच पध्दतीचा हा सुखी संसाराची घडी कै.रामजी व के.धोंडाबाई यांनी घातलेली आहे.या कुटुंबातील सर्वांत लहान असलेले विठ्ठल मोरे हे उत्तम व्यावसायिक तसेच मातब्बर राजकारणी आहेत.त्यांनी आपल्या व्यवसायाच्या उत्तम जम बसविला असून राजकारणातही त्यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

एक निष्ठावंत शिवसैनिक,ग्राम पंचायत सदस्य,सरपंच, शिवसेना विभागप्रमुख ते भाजपाचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशी त्यांची वाटचाल सुरू असून समाजकारणात ही ते आघाडीवर राहिले आहेत.गावातील समाजसेवक ते अखिल कोयना पुनर्वसन सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष म्हणूनही विठ्ठलजी मोरे यांनी यशस्वीपणे काम केले आहे.त्यांनी आपल्या धर्म पत्नीला म्हणजे सौ.वत्सलाताई यांना पक्षाच्या कठीण प्रसंगात पुढे येत खंबीरपणे उभे राहून निवडणूकीला सामोरे जात खालापूर पंचायत समितीच्या उपसभापती पदावर विराजमान केले आहे.

नुसते व्यावसाय,राजकारण,समाजसेवा करण्यापलीकडे त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण दिले आहे.त्यांची एक मुलगी डॉक्टर,मुलगा इंजिनिअर तर दुसरी मुलगीही उच्चशिक्षित आहे.आज ते भाजपाच्या वरीष्ठ पातळीवरील राजकारणात सक्रिय सहभाग घेतांना दिसतात.माजी आमदार देवेंद्र साटम यांचे ते खंदे समर्थक असून भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर,उरणचे आमदार महेश बादली यांच्या निकटचे सहकारी बणलए आहेत.
कै.धोंडाबाई यांचे २३जून २०२३ रोजी त्यांचे राहत्याघरी निधन झाले.त्यांच्या अंत्ययात्रेला भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर,माजी आमदार देवेंद्र साटम, अखिल कोयना सेवा संघाचे पदाधिकारी तसेच खालापूर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यांची पुढील विधी निमित्ताने रविवार दिनांक २जुलै रोजी सायंकाळी किर्तनकार ह.भ.प. चिंतामणी महाराज कदम(वनवठे) यांचे किर्तन होणार आहे.सोमवार दिनांक ३जुलै २०२३ रोजी ग्रामस्थ भजनी मंडळ वडवळ यांचे चक्री भजन होईल तर
उत्तर कार्य विधी निमित्ताने हभप रामदास महाराज पाटील यांचे किर्तन होणार आहे.

अध्यक्ष श्री विठ्ठलजी मोरे त्यांचे जेष्ठ बंधू राजाराम मोरे, पांडुरंग मोरे यांच्या मातोश्री धोंडाबाई रामजी मोरे यांचे नुकतेच निधन झाले,त्यांच्या सांत्वनासाठी गोरठण गावातील समाजसेवक तथा पीएनपी शाळेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,सदस्य उमेश पाटील, पत्रकार हनुमंत मोरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ईशान्य मुंबई जिल्हा सरचिटणीस तथा विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शशिकांत गोपाळ सावंत हे उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने