किरकोळ वादातुन खून करून पळून जाण्याच्या प्रयत्न करण्याला आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली १ तासात अटक


किरकोळ वादातुन खून करून पळून जाण्याच्या प्रयत्न करण्याला आरोपीला मानपाडा पोलिसांनी केली १ तासात अटक
पनवेल दि.२६ (संजय कदम) : डोंबिवली येथील टाटा पावर हाऊस परिसरात किरकोळ वादावरून इसमावर चाकुने ठिकठिकाणी वार करुन त्याचा खून करून परजिल्ह्यात पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अवघ्यां तासाभरात अटक केली आहे.           डोंबिवली येथील टाटा पावर हाऊस परिसरात मयत इसम शैलेश शिलवंत व आरोपी किरण शिंदे यांचा किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्या वादातुन किरण शिंदे याने त्याचेकडील चाकुने शैलेश याचे शरीरावर ठिकठिकाणी वार करुन त्याचा खून करून पळुन गेला. या घटनेबाबत माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आपला तपास सुरु केला. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कुराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोनिरी सुरेश मदने, सपोनि अविनाश वनवे, सुनिल तारमळे, दत्तात्रय सानप, ज्ञानोबा सुर्यवंशी, पोउनिरी. प्रदीप गायकवाड, पोहवा राजकुमार खिलारे, सुनिल पवार, दिपक गडगे, पोना शांताराम कसबे, यलप्पा पाटील, पोशि अशोक आहेर, विजय आव्हाड, महेंद्र मंजा, मिनीनाथ बढे यांच्या पथकाने पोलिसांनी तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने आरोपी किरण शिंदे हा गुन्हा केल्यानंतर तेथुन औरंगाबाद येथे पळुन जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अटक केली.


 त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. किरण शिंदे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी हल्ल्याचे २ गुन्हे व विनयभंगाचा ०१ गुन्हा दाखल आहे. सदरचा गुन्हा आरोपीत याने का केला, गुन्हा करताना त्याचेसोबत त्याचे काही साथीदार होते काय? याचा तपास पोलीस करीत आहेत. थोडे नवीन जरा जुने