कामोठ्यात रस्त्याची दुरवस्था


कामोठ्यात रस्त्याची दुरवस्था

पनवेल तालुक्यातील कामोठे सेक्टर ३४, ३५ व ३६ मध्ये १ महिना अगोदर महानगर गॅस कंपनी ने आपल्या तांत्रिक अडचणी करता रस्ते खोदले आहेत.. आपले काम पूर्ण झाल्या नंतर हे खड्डे बुजवण्या करिता महानगर गॅसच्यावतीने फक्त खडी आणी रेतीचा वापर करून खड्डे बुजवले असल्याने पहिल्याच पावसात हे सर्व खडी वाहून गेल्याचे दिसून येत आहे. या दुरवस्थेमुळे नागरीकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावर खड्डे पडले आहेत महानगर गॅसच्या कंत्रादाराने निष्काळजीपणा मुळे येथील रहिवाशांना तसेच गरोदर महिलांना यांचा मोठा मनस्ताप सहन करावे लागत आहे. पडलेल्या खड्ड्याची खोली देखील जास्त असल्यामुळे अनेक वाहतूक अपघात घडू शकते तसेच पावसाचे दिवस असल्यामुळे मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे आरोप राष्ट्रीय अँटी करप्शन बोर्ड राष्ट्रीय युवा अध्यक्ष गणेश जाधव यांनी केले आहे लवकरात लवकर बुजवावेत अन्यथा महानगर गॅस ऑफिस ठिकाणी खड्डे पूजन आंदोलन केले जाईल असा इशारा जाधव यांनी दिला आहे. तसेच खड्यामुळे होणाऱ्या जीवितहानी झाल्यास महानगर गॅस पूर्णपणे जबाबदार राहील असा इशारा देखील दिला आहे.


थोडे नवीन जरा जुने