नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अशोक राजपूत व योगेश गावडे या दोन नव्या सहाय्य्क पोलीस आयुक्तांची नियुक्ती*

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अशोक राजपूत व योगेश गावडे या दोन नव्या सहाय्य्क पोलीस आयुक्तांची नियुक्ती


पनवेल दि १२ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात अशोक राजपूत व योगेश गावडे या दोन नव्या सहाय्य्क पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर सहाय्यक पोलीस आयुक्त हे मुंबई व ठाणे येथून बदलून आले आहेत.


पोलीस महासंचालक कार्यालयाने नुकतेच अधिकारी वर्गाची बदल्या करण्याचे आदेश काढले आहेत. त्यामध्ये मुंबई येथे कार्यरत असणारे योगेश गावडे यांची नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे ठाणे येथे कार्यरत असणारे अशोक राजपूत यांची सुद्धा परिमंडळ -२ पनवेल सहाय्यक पोलीस आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. 


थोडे नवीन जरा जुने