नैनामुक्त करण्याची प्रकल्पग्रासतांची मागणी

नैनामुक्त करण्याची प्रकल्पग्रासतांची मागणीपनवेल तालुक्यातील २३ गावांमध्ये नैना प्रकल्प येऊ घातलेला आहे. मात्र गेली दहा वर्ष हा प्रकल्प रेंगाळला आहे. त्यामुळे लवकरात लवकर या विभागाला नैना मुक्त करावे अशी मागणी शेतकन्यांनी केली असून गेले काही दिवस उपोषणाला बसलेल्या महिलांनी पनवेल तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार विजय तळेकर यांची भेट घेऊन नैना रद्द करण्याविषयी भूमिका मांडली.नियोजित पुनर्विकासाबाबत कोणताही विचार नैनामार्फत केला गेला नाही. त्यामुळे सुकापूर, आदई व इतर गावांमध्ये हजारों सदनिकाधारक पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. नैना प्रकल्पामध्ये असलेले नियोजन हे शेतकरी तसेच व्यावसायिकाना देशोधडीला लावणारे आहे
. या प्रकल्पामध्ये शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. यासाठी नैनाच्या विरोधात प्रत्येक गावातील शेतकन्यांची ग्रामसभा घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत... या प्रकल्पामुळे शेतकन्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


थोडे नवीन जरा जुने