योग दिनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत 'चलो प्रबळगड'

जागतिक योग दिनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत 'चलो प्रबळगड' 

पनवेल(प्रतिनिधी) जागतिक योग दिनानिमित्त बुधवार दिनांक २१ जून रोजी सकाळी ६ वाजता भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्याची संधी मिळणार आहे.


         पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दि.२१ जून २०१५ रोजी पहिला जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. योग साधनेतून मिळणाऱ्या अनन्यसाधारण लाभांमुळे आज योग जगात सर्वत्र लोकप्रिय आहे. भारतीय ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा म्हणजे योग आहे, जो भारताने पूर्ण विश्वाला प्रदान केला. सर्व जग करोनाच्या विळख्यात अडकलेले असताना भारतातील अनेक योग प्रशिक्षकांनी “हे विश्वाची माझे घर” हाच विचार ठेवून सर्व जगामध्ये योग प्रशिक्षण दिले. विशेषत: मानसिक बळ वाढविण्यासाठी याचा उपयोग झाला. 
 श्वसन मार्ग शुद्ध करणारी, फुफ्फुसांना बळकटी देणारी ‘जलनेती’ ही शुद्धीक्रिया करोना काळात सर्वांसाठी लाभदायक ठरली. २१ जून जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे योग्य दिन साजरा केला जाणार आहे. यामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठ योगासने करणार आहेत.  थोडे नवीन जरा जुने